Saturday, October 17, 2020

स्त्री स्वातंत्र्यात की पारतंत्र्यात

 स्त्री स्वातंत्र्यात की पारतंत्र्यात

            महिला स्वतंत्रता समजण्या अगोदर आपल्याला आवश्यकता आहे, की महिलांना पारतंत्र्यमध्ये कोणी नेल आहे, मग याचा जर सरळ अर्थ काढला गेला तर असा होईल, पूर्ण या भूपृष्ठावर मानवाच्या दोन जाती आहेत. एक म्हणजे स्त्री अणि दुसरी म्हणजे पुरुष, तर साधी अणि सरळ निष्कर्ष आहे. जर आज स्त्री वर हे अत्याचार होत आहेत, ते पुरुष करत आहेत. किंवा आपण त्याला अजून चांगल्या भाषांमधे सांगू शकतो आपण त्याला *"हिंसाचार"* हा शब्द वापरू शकतो.

सर्व प्रथम आपण हिंसाचार या शब्दाचा अर्थ समजून घेऊ!!! 

"कुठल्याही व्यक्तीला एखाद्या विशिष्ट कृतींमुळे झालेला त्रास किंवा इजा म्हणजे हिंसाचार होय"

 अस काहीही नाही की फक्त भारत देशामध्ये स्त्री अत्याचार होत आहेत, तो मग विकसित, अविकसित किंवा विकसनशील देश असो महिलेवर होणारे अत्याचार हे सर्व ठिकाणी आहेत. आपण याला अस म्हणु शकतो पूर्ण जगामधे महिलेवर अत्याचार होतहोते-होत आहेत.

*स्वामी विवेकानंद म्हणतात*

*"जो पर्यंत स्त्रियांची परिस्थिती किंवा व्यवस्था पूर्ण पणे नाही सुधारणार तो पर्यंत विश्वकल्याणाची गोष्ट करणे बोथट ठरेल"*

       बघितल तर अस आहे भारताला स्वातंत्र्य मिळून आपण शंभरी गाठण्यात आहोत, पण तरी सुद्धा महिलेवर होणारे अत्याचार पूर्ण पणे थांबू शकलो नाही, म्हणजे कुठे तरी राजकिय म्हणा किंवा सामाजिक म्हणा चुका होत आहेत अणि हे निदर्शनास आणून सुद्धा यावर विचार विनिमय होत नसेल तर यामधे माणूस या प्राण्याची पूर्ण पणे हार झाली आहे. अस म्हणायला काहीही हरकत नाही, कारण बदल घडत असेल अणि त्याला विरोध होत असेल तर त्याला आपण बदल म्हणु नाही शकत.

   अणि मला अस वाटत की अशी गोष्ट भविष्यामध्ये आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळेल याची कुठेच शाश्वती नाही.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताने भारतीय संविधान तयार केले अणि त्यामधे विविध कलम तयार करण्यात आल्या त्यामधील *कलम-14, कलम - 15, अणि कलम - 16* या मध्ये अस नमूद केलेल आहे की देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे. त्या मध्ये मग *समानता, स्वातंत्र्यता अणि न्याय* याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. यामधे असा कोणताही भेदभाव दिलेला नाही की तुम्ही फक्त पुरुष आहात की स्त्री. म्हणजे याला अजून जर सरळ भाषेत बोलायच असेल तर अस म्हणता येईल*"स्त्री - पुरुष समानता"*

  मग ते शारीरिक रित्या किंवा मानसिक रित्या महिला असो किंवा पुरुष असो यामधे कसलेही भेदभाव केल्या जाणार नाही, अणि जर असा भेदभाव करण्यात आला तर त्याला असांविधानिक मानल्या जाईल. (भारतीय संविधानाच उल्लंघन केल अस समजल्या जाईल)

अजून सांगायच झाल म्हणजे कलम - 15 मध्ये अस नमूद आहे जर काही कारणास्तव पुरुष महिला वर्गीकरण करण्यात आले तर त्यामधे महिलेला पूर्णता स्वातंत्र्य - समानता, अणि न्याय याचा पूर्ण विचार करून महिलांना त्यांची सुरक्षा अणि संरक्षणाची पूर्ण जबाबदारी ही सरकारची असते.जून यामध्ये विचार करायचा असेल तर आपल्याला थोडासा इतिहासात जाव लागेल अणि अजून अभ्यास करण्याची खूप नितांत गरज आहे अस मला तरी वाटत.

         मी स्वतः खूप सारे विडीओ बघितले अणि खूप सारे भाषण सुद्धा ऐकले त्यामधे सांगतात महिला सशक्तीकरण करणे खूप गरजेचे आहेत अणि बोलायला लागतात "भारत हा पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे"

इथेच तर मोठी गफलत झालेली आहे तर कस बघा

भारत हा पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे म्हणजे नेमके कसा आहे?????

    याचा विचार करण इथे खूप गरजेच आहे मला अस वाटत पुरुषप्रधान देश म्हणजे सरळ आहे की महिला याना इथे दुय्यम स्थान दिले आहे अणि हेच दुय्यम स्थान यांना गुलामीची जाणीव करून देत आहे अणि त्यांना त्यांच्या अधिकार पासून वंचित ठेवत आहेत यात अजून एक गोष्ट आहे ती त्यांचा अडाणी पणा, ज्या महिलांना शिक्षण काय असते हेच माहीत नाही त्यांना त्यांचे कोणते अधिकार आहे हे कस माहीत होणार अणि हे होणे खूप गरजेचे आहे.

एक प्रसिद्ध communists विचारक आहे Frendrik Angel त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहल आहे *"संपत्ती ही जर फक्त रक्ताच्या नात्याला त्यातल्यात्यात जर फक्त मुलाला मिळत असेल अणि समाज याला योग्य समजत असेल तर यामधे मातृसत्ताक व्यवस्थेला मिळालेली जागतिक पातळीवर हार आहे अस म्हणायला काहीही हरकत नाही"* अणि यामुळे महिला अजून किती वर्ष पारतंत्र्यात जगातील याचा अंदाज करणे मलाही जमणार नाही.

      एक साधासा विचार करण्याची गोष्ट आहे परिवार हा काही आर्थिक व्यवस्था असलेला विचार नाही आहे. हा एक भावनात्मक आणि सामाजिक विचार करून घेतलेली व्यवस्था आहे अस मला वाटत. याची निर्मिती काही आर्थिक समजदारी सोबत कधी होत नाही अणि कधी केला जाणार नाही हे फक्त स्त्री - पुरुष या दोघांनी मिळून केलेला एक भावनिक (स्वाभाविक) बदल अणि सामाजिक विचार करून घेतलेला निर्णय याला प्रबळ करतो. हे सर्व माहीत असताना महिला सशक्तीकरण करणे खूप गरजेचे आहेत याचे कारण पण आपल्याला देता येईल. दिवसांनदिवस वाढत चाललेले अत्याचार हे काही कमी होण्याच्या मार्गावर नाही आहेत.

मागील काही दिवसापूर्वी *जम्मू आणि काश्मीर मध्ये कठुवा, उत्तर प्रदेश मध्ये उन्नव, दिल्ली मध्ये निर्भया हत्याकांड,महाराष्ट्रामधील कोपर्डि हत्याकांड, हैद्राबाद मध्ये एका डॉक्टर झालेला हत्याकांड, अणि आता नुकतेच झालेल उत्तर प्रदेश मध्ये हाथरस* मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार अणि तिच्या केलेल्या दयनीय अवस्था तुम्हाला आम्हाला बघवत सुद्धा नव्हत अणि त्या निर्जीवि माणसाने त्या मुलाला अश्या असह्य वेदना देऊन मारून टाकले. अणि अश्या अजून किती तरी महिला आहेत की त्या आपल्या घरची अब्रू रस्त्यावर नाही आली पाहिजे म्हणुन हे सर्व वेदना सहन करत आहेत. अश्या अजून कितीतरी महिला आहेत की ते आपले दुःख कोणासमोर सांगू शकत नाही.अश्या रोजच्या होणार्‍या घटनांमुळे माझा राज्यच नव्हे तर पूर्ण देश आज ह्या विचारांमधे जळत आहे. इतक होऊन सुद्धा काही राजकिय मंडळी यावर अशे अपशब्द वापरतात त्यांच्या त्या विचारशैलीला जणू काही किडे लागले आहेत. अश्या ह्या घटनांमुळे मनामधे प्रश्न उद्भवतो की खरच महिलांच्या सुरक्षा बाबतीत माझ्या देशात कशी सुरक्षा केली पाहिजे.

     महिलेच्या सुरक्षा बाबत या समाजामधे मानसिकता व त्यांना दिल्या जाणार्‍या दुय्यम वागणुकीमुळे हिंसाचाराचा प्रभाव दिवसेंदिवस इतका प्रचंड वाढला आहे की आम्ही त्या गोष्टीकडे पूर्ण पणे विचार करणे बंद केलेल आहे आम्ही फक्त इतकाच विचार करायला लागलो आहे की, माझ काय काम आहे ते मी चांगल्या प्रकारे करत आहे. होत असेल तर माझ्या परिवार नाही आहे म्हणुन शांततेचा आम्ही मौन धारण केलेल आहे. पुरुष जेंव्हा एखाद्या अडचणीत सापडतो तेंव्हा त्याला मानसिक त्रास होतो म्हणुन तो मद्य सेवन करून घरी बायकोला, आईला, मुलाना, मुलीना घरातल्या लोकाना त्रास देतच असतो.

         महिला हिंसाचार हा फक्त शिवीगाळ करणे, मारहाण करणे इथपर्यंत मर्यादित नाही तर यामधे आर्थिक, लैंगिक, शारीरिक, मानसिक, शैक्षणिक अश्या भरपूर रोजच्या अत्याचारांना समोर जावे लागते

1) शारीरिक हिंसा :- एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याकरता धमकी देणे, मारहाण करणे, वस्तूने मारणे, चिमटा घेणे, त्याच्या अंगावर थुंकणे, नखाणे ओरबाडून काढणे, लाथा बुक्क्यांचा मार देणे अस काही केल्यास आपण त्याला शारीरिक हिंसाचार म्हणतो.

2)स्त्रीयावर नियंत्रण, बंधन घालणे :- स्त्रीयांना घराबाहेर पडू न देणे खास करुन संध्याकाळी रात्री, नोकरी करू द्यायची नाही, तिच्यावर सतत नियंत्रण ठेवणे तिने कपडे कशी घालावीत यावर निर्बंध आणणे तिच्या कडील पैशाच्या गैरवापर करणे (लुबाडून किंवा चोरून)

3)भावनिक किंवा मानसिक हिंसा :- एखाद्या गोष्टीवरून महिलेस टोचून बोलणे, केलेल्या कामात सतत नापसंद दर्शविने, माहेरच्या लोकांबद्दल सतत वाईट बोलणे.

4) लैंगिक छळ :- स्त्रीयाच्या इच्छाविरुद्ध लैंगिक सबंध ठेवणे, इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श करणे, बलात्कार, छेडछाड, कामाच्या जागी लैंगिक त्रास देणे, विनयभंग करणे, अश्लील इशारे करणे.

अजून अश्या बर्‍याच गोष्टी आहेत ज्यावर समाजाने, सरकारने खूप नाही पण मोजकेच असे नियम तयार करू शकतो याची पूर्ण पडताळणी करणे खूप गरजेचे आहे. अश्या काही घटना जर महिला सोबत हा पुरुष जातीचा जो किडा आहे किंवा अश्या मानव जातीला लागलेली कीड आहे ती कीड वेळेवरच धरून ठेचलेली केंव्हाही बरी जेणेकरून यांच्यामुळे समाजामधे वासना नावाची दुर्गंधी वाढणार नाही.

   *थोडासा चौकटीच्या बाहेर जाऊन जर विचार केला तर*

✔️खरच या गोष्टी होत्या का ज्या आज आपण बोलत आहोत खरच पूर्वीच्या काळी महिलेवर अत्याचार होत नव्हते का???

✔️तेंव्हा महिला पूर्ण स्वातंत्र्य होत्या का?

✔️पसंद असलेल्या व्यक्ति सोबत त्यांच्या सोबत विवाह करू शकत होते का?

✔️त्या काळात ती शिक्षण घेत होती का?

✔️समाजामधे वावरत असताना ती आपल्या मनाने निर्णय घेऊ शकत होती का?

*तर आपल्याला अस म्हणता येईल हो पण नाही अणि नाही पण नाही. जर अस आपण बघितल तर स्त्री किंवा पुरुष दोघेही पण आपल्या मनाप्रमाणे करण्यास स्वातंत्र नाही आहे. कारण समाज अणि परिवार या व्यवस्थेला काही निर्बंध आहेत अणि ते निर्बंध पाळूनच तुम्हाला त्यामधे चालायच आहे कोणावर अत्याचार करून नाही चालायच आहे.*

हे सर्व माहीत असताना सुद्धा आपण कळत न कळत महिलेवर हिंसाचार करत असतो मग ती घरामधील महिला असो किंवा दुसर्‍याच्या घरातील असो. पण हे होत असताना यामधे पुरुष जितके जबाबदार ह्या हिंसाचाराच्या आहारी गेलेले आहे. महिला सुद्धा यामधे सहभागी आहेतच यात तिळमात्र शंका नाही.

*अत्याचार करणार्‍या पेक्षा, अत्याचार सहन करणे सुद्धा एक गुन्हा आहे.*


*विश्वंभर राठोड*

*9764126745*

Saturday, February 2, 2019

बाबा (माझा हिरो)




बाबा माझा हिरो


बाबा माझा हिरो  जवळपास सर्व्हंचच हिरो ,
आई आणि बाबा यांच्या मधे जास्त काही अंतर नाही ,
आई धरती आहे तर बाबा आकाश आशतलच काही  तरी ,
ज्यावेळेस आपण जन्म घेत असतो त्यावेळेस आई,
खूप यातना सहन करत असते ,
पण आपला हसु पाहून आई ते पण विसरते ,
बाबा मात्र आपल्यासाठी हसत हसत दिवस रात्र मेहनत करत असतो ,
शिस्त लावत असतो आपल्याला आणि,
आप्ल्यतल हिरव अंकूर जपत असतो ,
त्यांना कसलच भान नसत हो , फक्त कष्ट करत रहातो आपल्यासाठी ,
चिमटा घेतो त्याच्या स्वतच्या पोटाला अन बॅंक मधे पैसा जमा करत असतो ,
तुमचा शब्द तो कधिहिच खाली पडू देत नाही ,
तुमची हौश भागविन्यकरिता  त्यांनी पहिलेल्या स्वप्नना  पण तुम्च्यात पहात असतो ,
तुम्ही म्हजे ना त्यांची स्वप्न , आणि तुम्ही म्हंजेच त्यांचा आधार ,
तुमच्यासाठी गिळत असतो तो अवघि लाळ,
तुम्ही जेंव्हा मान टाकता ना खाली, तेंव्हा बाबा सुधा खचुन जातो हो  ,
पण आधार देता देता मन मारुन तो हसत असतो ,
तुमच्या कडून त्यांना तस काहीच हव नकोय , फक्त तुमच यश पहयचय त्यांना ,
आणि त्यामधेच त्यांच पोट भरत असत ,
त्यांच्या वेदना नाकोनालहि कळल्या अनि कधिच कळनार नाहि ,
जग नेहमिच म्हणत असत आई इतक बाबा कधिच सोसत नाहि पण ,
बाबाच्य वेदना कधिच कळनार नाहि ,
आज त्याला माघित्ल्यावर मुळी सुधा कळनार नाहि  तुम्हला ,
हे कधि कळेल एक दिवस तुम्हि सुद्धा बाबा ह्वाल ,
त्यांच्या डोळ्यात जेव्हा तुमचे राहिलेले स्वप्न पाहसल ना तेंव्हाच कळेल ,
तेंव्हा म्हनाल ,
अरे आपला बाबा ना कधिच चुकत नव्हता ,
आपल्या साठी दिवसेचा रात्र आणि रात्रिचा दिवस करत राब राब राबला ,
म्हणून एक विचार करायचा आहे  आता ,
जेंव्हा त्यांचे हात थर थर कपायाला लगले ना तेंव्हा त्यांचा हात घट्ट पकडा ,
आणि सोबत चला त्यांच्या.

                                                                           
                                                                         © विश्वंभर राठोड